दहावी परीक्षेचा पहिला पेपर आणि कोरोनाचे संकट यामुळे पालक वर्गातून भीती आहे. अनेकजण पेपर पेक्षा कोरोनाची धास्ती घेत आहेत. मात्र वडगाव येथील एका मुलीने पेपरच्या भीतीपोटी आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे. यामुळे ही घटना धक्का देणारी आहे.
मागील अनेक दिवसांपासून दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यात येत होते. मात्र पेपरच्या पहिल्या दिवशी एका विद्यार्थिनीने आत्महत्या करून दिल्याने खळबळ माजली आहे. हा प्रकार अनेकांना धक्का देणारा असला तरी अनेकांनी न घाबरता पेपर लिहावा असे जाणकारांनी व्यक्त करण्यात येत आहे. इतके दिवस अभ्यास करून देखील विषय, अभ्यासक्रम लक्षात राहिना, मी परीक्षेला बसले तर नापास होते. अशी भीती मनात बाळगलेल्या दहावीच्या विध्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना बुधवार (ता.24) रात्री कलमेश्वररोड वडगाव येथे घडली असून सुजाता सुभाष ढगे ( वय 16) असे तिचे नाव आहे. आज गुरुवारी (ता.25) पासून दहावी वार्षिक परीक्षेला सुरुवात झाली असून त्याआधीच केवळ भीतीपोटी विध्यार्थीनीने गळफास घेण्याइतके टोकाचे पाऊल उचलल्याने पालकवर्ग धास्तवला आहे.
परीक्षेची भीती न बाळगता आणि कोरोनाशी टक्कर देत अभ्यास करून या सार्या अडचणीवर मात करणे हाच भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पर्याय आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता बिनधास्तपणे पेपर लिहावा असे मत पालक वर्ग आणि जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.