सर्वोच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.त्यामुळे दहावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी दहावी परीक्षेला स्थगिती द्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने पालक आणि विद्यार्थी यांना त्रास होऊ शकतो अशी भूमिका राजश्री नागराजू यांनी मांडली होती.सरकारने आवश्यक ती सगळी काळजी घेऊन दहावीची परीक्षा घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.