दहावीच्या परीक्षेसाठी शाळांनी आता पालकांच्याकडून मान्यता पत्र घेण्यास प्रारंभ केला आहे.25 जून ते 2 ऑगस्ट पर्यंत दहावीची परीक्षा होणार आहे.25 जून रोजी पहिला पेपर होणार असून त्या दृष्टीने शाळांमध्ये देखील तयारी सुरु आहे.कोव्हिड 19 चे सावट दहावीच्या परिक्षेवर असणार आहे.त्यामुळे विद्यार्थी,पालक आणि शिक्षवर्गाची दहावीची परीक्षा म्हणजे कसोटी ठरणार आहे.
आता शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकांच्या कडून एक मान्यता पत्र घेण्यास प्रारंभ केला आहे.
त्यामध्ये माझा मुलगा/मुलगी दहावीच्या परीक्षेला उपस्थित राहील.त्याला परीक्षा केंद्रावर दुचाकी/चार चाकी /इ. ने मी सोडण्यास येईन.
कोव्हिड 19 संबंधी घ्यायची सगळी खबरदारी घेतली जाईल.परीक्षा केंद्रावर मुलगा/मुलगी मास्क,सानिटायझर,पाण्याची बाटली आणि परीक्षेचे साहित्य(पेन,पेन्सिल,कंपास ,पट्टी इ.) साहित्य घेऊन येईल.
परीक्षा केंद्रावर सोडण्याची आणि परत नेण्याची मी स्वतः जबाबदारी घेईन असे त्या छापील मान्यता पत्रात नमूद करण्यात आले आहे.तळाशी पालकांनी सही करायची आहे.हे मान्यतापत्र घेण्याचा उद्देश काय असा सवाल पालकवर्ग विचारू लागला आहे.