मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले असतांना आता पुन्हा नैऋत्य मोसमी वारे वाहू लागले आहेत. कर्नाटकात दाखल झालेल्या मान्सून बेळगाव येथेही लवकरच दाखल होणार आहे. मृग नक्षत्रावर हा पाऊस दाखल होऊन पुढील वाटचाल करणार आहे.
मान्सूनपूर्व पावसाने पेरणी झालेल्या पिकांना आणि पेरणी करण्यात येणाऱ्या पिकांसाठी ही पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रविवार दिनांक 7 जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे.
मध्यरात्री बारा वाजून 28 मिनिटांनी हे नक्षत्र लागणार असून त्याचे वाहन महिष आहे. हा पाऊस अल्प प्रमाणात होणार असून दिनांक 7 8 9 10 11 14 15 18 19 तारखांना बेळगावात हजेरी लावणार आहे तर काही भागात वृष्टी होईल असे भाकीत करण्यात आले आहे. एक जून पासून मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर गुरुवारी कर्नाटकात हजेरी लावली आहे. लवकरच आता बेळगावात हा पाऊस दाखल होणार आहे. जोरदार पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी घरातही पाणी गेले आहे. त्यामुळे अनेकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या शेती कामांना उघडीप हवी होती, आता पावसाने विश्रांती घेतल्याने शेती कामांना गती येणार आहे. सर्व शेतकरी पेरणीच्या कामात गुंतणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. लवकरच बेळगावात ही मान्सून दाखल होणार असे हवामान खात्याने सांगितले आहे.