कोरोनामुळे एपीएमसी मधील व्होलसेल भाजी मार्केट ऑटो नगर व हिंडलको जवळ हलवण्यात आले होते गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे तात्पुरता स्थलांतरित केलेले मार्केट मध्ये पाणी साचलं आहे त्यामुळे व्यापार करण्यास शेतकरी व व्यापाऱ्यांना त्रास होत आहे.
जिल्हा प्रशासनाने सदर मार्केट शनिवारी 6 जून व रविवारी 8 जून रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस हे व्होलसेल भाजी मार्केट बंद ठेवण्यासाठी व्यापारी दलाल आणि शेतकऱ्यांनी अनुकूलता दर्शवली आहे अशी माहिती एपीएमसी सेक्रेटरीनी दिली आहे.
व्यापाऱ्यांनी मार्केट दोन दिवस बंद करण्यास संमती दर्शवली आहे शेतकरी व्यापारी खरेदी दारांनी सहकार्य करावे असे आवाहन एपीएमसी सेक्रेटरीनी केले आहे.
तात्पुरते सुरू असलेले व्होलसेल भाजी मार्केट एपीएमसी मार्केट यार्ड मध्ये पूर्ववत करावे अशी अनेक व्यापाऱ्यांची मागणी वाढत आहे.तात्पुरत्या मार्केट मध्ये झालेले चिखलाचे आणि सुविधांचा अभाव त्यामुळे व्यापारी शेतकरी हैराण झाले आहेत अश्यात तात्काळ एपीएमसीत सदर मार्केट शिफ्ट करण्याबाबत ए पी एम सी अध्यक्षांनी प्रयत्न चालवले आहेत मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यां कडून याला अद्याप ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने हा निर्णय प्रलंबित आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत अद्याप निर्णय झाला नव्हता मात्र सोमवारी 8 जून पर्यंत याबाबत काही तरी निर्णय होईल अशी शक्यता आहे