बेळगावच्या नियाज हॉटेल ते कीर्ती हॉटेल पर्यंत जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र बंद करण्यासाठी वापरलेल्या बॅरिकेड्सवर कोरोना हॉटस्पॉट असा उल्लेख आल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. हा फलक काढावा आणि रस्ता दुरुस्ती करून लवकरात लवकर खुला करावा अशी नागरिक व व्यापाऱ्यांची मागणी आहे.
या रस्त्याला दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावण्यात आले असून त्यावर कंटेन्मेंट झोन व हॉटस्पॉट असे उल्लेख आले आहेत. या भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत का असा संशय निर्माण झाला आहे.
हॉटस्पॉट भागात पूर्वी लावलेले बॅरिकेड्स येथे लावताना त्यावरील फलक काढायचे राहून गेले की खरंच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असा प्रश्न लोकांना पडत आहे.
प्रशासनाने स्मार्ट सिटी च्या दुरुस्ती कामासाठी रस्ता बंद केलाय की कोरोना रुग्ण मिळाले यासाठी हे स्पष्ट करावे आणि रस्ता लवकरात लवकर खुला करावा अशी नागरिकांची व व्यापाऱ्यांची मागणी आहे.