पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित अमोल काळे याने वापरलेल्या सीमकार्डचा तपास पोलिसांनी हाती घेतला आहे.
गौरी लंकेश यांची हत्या व्हायच्या अगोदर दीड वर्षांपूर्वी 1 जानेवारी 2016 अमोल काळे बेळगावातील एका झेरॉक्स सेंटरला गेला होता.तिथे संतीबस्तवाड गावातील एका तरुणाच्या आधार कार्डचे झेरॉक्स देऊन आयडिया कंपनीचे सिमकार्ड घेतला होता.
गौरी लंकेश हत्या प्रकरणा नंतर विशेष पोलीस पथकाने सिमच्या आधारे संतीबस्तवाड गावात जावून तरुणाची चौकशी केली.त्यावेळी त्या तरुणाच्या आधार कार्डच्या झेरॉक्सचा वापर करून अमोल काळे याने सिमकार्ड घेतल्याचे समजले.
पोलीस पथकाने चौकशी केल्यावर तो तरुण घाबरला आणि त्याने 2018 मध्ये ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.पण ते झेरॉक्स सेंटर मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने ते प्रकरण मार्केट पोलीस स्थानकाकडे सोपवण्यात आले.