सदाशिवनगर व्यतिरिक्त सर्व शहर कंटेनमेंट झोन झालेले असताना शहरातील विविध उपनगरात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात पुन्हा कंटेनमेंट झोन निर्माण होणार आहे.
मंगळवारी एकाच दिवशी जिल्ह्यात 51 पोजिटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर बुधवारच्या दिवशी पुन्हा बारा इतके रुग्ण आढळले आहेत.ही माहिती आरोग्य खात्याच्या जिल्हा बुलेटिनमध्ये देण्यात आलेली आहे.तर राज्यातील बुलेटिनमध्ये बेळगावात एकही नव्या रुग्णाची नोंद नाही.
बेळगाव जिल्ह्यात बुधवारी 12 इतके रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 216 झाली आहे तर राज्यात देखील नवे 267 इतके आढळले असून राज्यात रुग्ण संख्या 4063 इतकी झाली आहे.
14 मे रोजी सदाशिवनगर येथील मुंबई रिटर्न गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाली होती त्यानंतर 18 दिवसानी शहरात कोरोनाची रि एंट्री झाली आहे.लागण झालेल्या रुग्णांत बहुतांश रुग्ण महाराष्ट्र रिटर्न आहेत.