भाजपमध्ये मंत्रिपद आणि राज्यसभा तिकिटावरून नाराजी निर्माण झाली असून याचे रूपांतर बंडात होणार काय याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.आमदार उमेश कत्ती यांनी डिनर डिप्लोमासीच्या नावाखाली बंगलोर येथील निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक घेण्यास प्रारंभ केला आहे.
या बैठकीत मुरुगेश निराणी,बसवराज पाटील यत्नाळ आणि रामदास यांच्या बरोबर अनेक आमदार उपस्थित होते.त्यामुळे येडीयुरप्पा यांच्या सरकारला धोका निर्माण होणार काय याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.अशा परिस्थितीत जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या संपर्कात काँग्रेसचे आमदार असून ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत.बावीस आमदार आपण भाजपमध्ये आणू शकतो असे सांगून त्यांनी खळबळ उडवली आहे.
येडीयुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले , मंत्रिपद आणि महामंडळाचे पद मिळवण्यास इच्छुक असलेले आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र आले आहेत.त्यामुळे येडीयुरप्पा यांना टेन्शन आले आहे.पण भाजपचे टॉप ब्रास नेते अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी तुम्ही नाराजाकडे लक्ष देऊ नका.
कोरोनवर नियंत्रण आणण्यासाठी आणि विकासकामांची पूर्तता करण्याकडे लक्ष द्या असे सांगितले आहे.त्यामुळे अमित शहा आणि जे पी नड्डा हे कर्नाटक भाजपमधील संभाव्य बंड कसे हाताळणार याची चर्चा सुरू आहे.