कोरोना महामारी मुळे मोठी समस्या उद्भवली आहे. अशा परिस्थितीत सर्वांचीच आर्थिक घडी बसवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी ती आणखी काही दिवस अशीच विस्कळीत राहणार यात शंका नाही. बेळगावात कोरोनावर कोणत्या पद्धतीने उपचार पद्धत केली जात आहे आणि यासाठी कोणती मदत लागणार आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे सोमवार दिनांक 15 रोजी जिल्हा पंचायत सभागृहात सकाळी 11 वाजता तालुक्यातील सर्व अधिकारी तालुका पंचायत सदस्य आणि तालुक्यात येणाऱ्या दहा जिल्हा पंचायत सदस्यांची बैठक घेणार आहेत.
कोरोना वर मात करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने प्रयत्न करण्यात येतील आणि विकास कामांना कशाप्रकारे गती देण्यात येईल याची माहिती जाणून घेणार आहेत. त्यामुळे सोमवारी जिल्हा पंचायत सभागृहात महत्वाची बैठक होणार असून विविध विषयांवर चर्चा होणार आहे. आता सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आरोग्य विभागाला आणि तालुक्यातील इतर अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी आणि केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे सारे अधिकारी कामाला लागले आहेत.
बेळगाव तालुक्यात कोणत्या प्रकारे विकासकामे करण्यात येत आहेत आणि कशा प्रकारे लढा दिला जात आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
पहिल्यांदा तालुक्यातील सर्व अधिकारी आणि जिल्हा पंचायत सदस्य तालुका पंचायत सदस्य यांची बैठक पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे घेत आहेत. त्यामुळे बैठकीत काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.