पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी शुक्रवारी सकाळी बेळगावला पहिलेंदा येत आहेत. त्यावेळी कुणीही गुच्छ आणू नये असे आवाहन केले आहे.
मी शुक्रवारी बेळगावला येत आहे.पालकमंत्रीपद स्वीकारल्यावर मी प्रथमच बेळगावला येत आहे.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे.त्यामुळे मला भेटायला शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळून नियमांचे पालन करावे.
मला शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांनी हार तुरे, पुष्पगुच्छ आदी आणू नयेत असे आवाहन मंत्री रमेश जारकीहोळी यांनी नेते मंडळी,कार्यकर्ते,अधिकारी यांना केले आहे.