इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मूळच्या बेळगावच्या राजीव मेत्री यांची नॉर्थ वेल्स मधील बोडेलविडन शहराच्या कौन्सिलरपदी निवड झाली आहे.
राजीव मेत्री हे मूळचे बेळगाव जवळील दड्डी गावचे असून नोकरीनिमित्त इंग्लंडला 2001 मध्ये गेले आहेत.ते कारडीओलॉजी विभागात सेवा बजावत आहेत.अलीकडेच मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राजीव आणि रीना यांना लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या होत्या.
कारण कोरोना रुग्णावर उपचार करताना राजीव आणि रीना यांनाही त्रास झाला होता.आता दोघेही बरे होऊन पुन्हा रुग्णसेवेत गुंतले आहेत.