Friday, November 15, 2024

/

बेळगाव रेल्वे बस स्थानकावर केवळ चाळीस बसफेऱ्या

 belgaum

महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या बेळगाव रेल्वे बस स्थानकाला मोठे महत्त्व आहे. या बसस्थानकावरून गोवा राजाला अनेक बस ये-जा करतात. मात्र कोरोनामुळे सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. अजूनही हीच परिस्थिती बेळगावच्या रेल्वेस्थानकावर दिसून येत आहे.

लॉक डाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही शिथिलता आणल्यानंतर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दररोज 216 बसफेऱ्या होणाऱ्या या रेल्वे स्थानकावर आता केवळ मोजक्याच बसफेऱ्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहरातील मुख्य आणि महत्त्वाचे मानले जाणारे बेळगाव रेल्वे बस स्थानक प्रवासी नसल्याने सुने सुने पडले आहे.

त्यामुळे या ठिकाणी केवळ दिवसाकाठी 35 ते 40 वर्षे फेऱ्या होऊ लागले आहेत. यामध्येही विशेष करून ग्रामीण भागातील प्रवासी एक किंवा दोन इतकेच आले आहेत. याचा परिणाम खजिन्यावर होताना दिसू लागला आहे. सुरुवातीच्या काळात केवळ पाच फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता या बस फेऱ्यांमध्ये वाढ होत असल्याचे तेथील अधिकार्‍यांनी सांगितले आहे. मात्र अजूनही म्हणावा तितका प्रतिसाद प्रवाशांनी दिला नाही.

या बसस्थानकासमोर रेल्वे स्थानक असल्याने येथील गजबज कायम असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे बंद करण्यात आल्याचा फटका या रेल्वे बस स्थानकाला बसला आहे. आणखी काही दिवस या बस स्थानकावर शुकशुकाट असणार आहे. दरम्यान बसफेऱ्या वाढत असून त्या पूर्ववत करण्यासाठी परिवहन महामंडळ प्रयत्न करत आहे.मात्र प्रवासी नसल्याने येथील परिस्थिती हलाखीची बनल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी अजूनही काही दिवस असेच चालणार असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जोपर्यंत रेल्वे सुरळीत होत नाही तोपर्यंत येथील बस स्थानकावर प्रवासी येणार नसल्याचेही ही सांगण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.