लॉक डाऊन कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चोवीस तास पोलीस कार्यरत आहेत.त्या बरोबर आपल्या आजूबाजूला देखील लक्ष ठेवून आहेत.
इसाक अली हे देखील पोलीस कर्मचारी आहेत.मार्केट पोलीस स्थानकात ते सेवा बजावतात.त्यांना रस्त्यातून जात असताना काही कागद पडलेले दिसले.ते कागद कशाचे आहेत म्हणून पाहिले असता ते एल आय सी चे बॉण्ड असल्याचे त्यांच्या ध्यानात आले.त्याचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी रस्त्यावर पडलेले बॉण्ड गोळा केले.
ते 56 बॉण्ड होते.ते बॉण्ड इसाक अली यांनी एल आय सी च्या कार्यालयात नेऊन अधिकाऱ्यांच्या हाती सुपूर्द केले.अधिक चौकशीअंती हे बॉण्ड लहान मुलांनी घरातून बाहेर टाकले असल्याची माहिती मिळाली आहे.म्हणून पालकांनी महत्वाची कागदपत्रे,इजा होईल अशा वस्तू मुलांच्या हाती लागतील अशा ठेवू नयेत .