बेळगाव भाग्यनगर येथील एक इमारतीत मृतावस्थेत आढळलेल्या त्या मोरावर वन विभागाने अंत्यसंस्कार केले आहेत. राष्ट्रीय पक्षाचा आदर राखून त्याला शेवटचा निरोप देण्यात आला.
भाग्यनगर येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा मोर मृत अवस्थेत मिळाला होता. हा मोर बघून अनेकजण चक्रावले होते. अखेर नागरिकांनी वन खात्याला कळवून या मोराच्या मृत्यूची बातमी दिली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पंचनामा केला आणि मोराचा देह ताब्यात घेतला. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे आणि घातपात नसल्याचे निदर्शनास येताच वन विभागाने पुढील प्रक्रिया केली आहे.
त्या मोरावर योग्य आदर राखून मच्छे येथील फॉरेस्ट नर्सरीत अंत्यसंस्कार केले अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. यामुळे त्याला योग्य पद्धतीने निरोप देण्यात आला आहे.