बऱ्याच वर्षापासून शहरातील समर्थनगर येथील रस्त्यांचे व्यवस्थित डांबरीकरण केले जात नसल्यामुळे या रस्त्यांची पावसाळ्यात पार दुर्दशा होत होती. परंतु आता बेळगाव उत्तरचे आमदार ऍड अनिल बेनके यांच्या प्रयत्नांमुळे समर्थनगर येथील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या बऱ्याच वर्षापासून समर्थनगर येथील रस्त्यांना कोणीही वाली नसल्यामुळे या रस्त्यांची फार दुर्दशा झाली होती. दर पावसाळ्यात या रस्त्यांवर पाणी साचणे बरोबरच चिखलाची दलदल निर्माण होत होती. परिणामी समर्थनगरवासियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र आता बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नांमुळे येथील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या कॉंक्रिटीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून पावसाळ्यापूर्वी आमदार बेनके यांच्यामुळे हे काम होत असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
याबद्दल समर्थनगरवासियांतर्फे आमदार बेनके यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर मंजुनाथ धरणावर याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष कणेरी, नागेश गावडे, विनायक इंचल, विनायक कणेरी, विजय वर्मा, महादेव पाटील, निलेश कणेरी, सुरेश पाटील, अरुण गावडे, साई कणेरी, दयानंद हिरेमठ, गोडसे भटजी आदी उपस्थित होते.
समर्थनगर येथील रस्त्यांबाबत आजपर्यंत फक्त आश्वासने देण्यात आली होती. परंतु कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार अनिल बेनके यांनी आश्वासन न देता थेट रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात केल्यामुळे समर्थ नगरच्या नागरिकांच्यावतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. समर्थनगरातील विनायक मार्ग,५ वा क्रॉस, ४ था क्रॉस, समोरील ४ था क्रॉस, ५ वा क्रॉस हे सर्व सिमेंट कॉक्रीटिकरण करण्यात येत आहे. याबद्दल श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ तसेच समर्थनगरच्या नागरिकांच्यावतीने आमदार अॅड. अनिल बेनके यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.