Friday, December 27, 2024

/

उत्तर आमदारांची मागणी अन पालकमंत्र्यांचा आदेश

 belgaum

kबेळगाव उत्तरच्या आमदार अनिल बेनके यांनी शुक्रवारी जिल्हा पंचायत मध्ये झालेल्या बैठकीत मागणी केली त्यावर पावसाळ्यापूर्वी “बळ्ळारी”सह सर्व नाल्यांची करा स्वच्छता असा आदेश जिल्हा पालक मंत्र्यांनी दिला.

पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीचे संकट टाळण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील बळ्ळारी नाल्यासह सर्व नाल्यांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी युद्धपातळीवर साफसफाई झाली पाहिजे असे रमेश जारकीहोळी यांनी सूचित केल.

View this post on Instagram

जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी केला वनमहोत्सव साजरा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते आज शुक्रवारी सकाळी कणबर्गी येथे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते विविध झाडांची रोपटी लावण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्र्यांसमवेत बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी तसेच वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते.

A post shared by Belgaum live (@belgaumliveofficial) on

बेळगाव जिल्हास्तरीय कोरोना विषाणू प्रादुर्भाव (कोव्हीड -19) आणि पूरग्रस्त परिस्थिती उपाय योजना आढावा बैठक शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहामध्ये पार पडली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी उपरोक्त आदेश दिला. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकी याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, जि. पं. अध्यक्ष आशा एहोळे, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही. आदी उपस्थित होते.

या बैठकीप्रसंगी बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की कोरोना चा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच संशयितांना तोरण टाईम करण्याचे उत्तम काम कार्य जिल्हा प्रशासन व पोलिस खात्याने केले. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री मंत्र्यांनी राज्यात लोक डाऊन ची घोषणा करण्यापूर्वी दोन दिवस आधी बेळगाव जिल्हा प्रशासनाने लोक डाऊन जारी केला त्यामुळेच बेळगाव जिल्हा हा राज्यात सर्वाधिक वेगाने कोरूना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणणारा जिल्हा ठरला आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस खात्याचे अभिनंदन करावे तितके कमी आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांमुळे बेळगावसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत महाराष्ट्रातून येणाऱ्यांवर तूर्तास बंदी घालण्यात आली आहे. यावर पळवाट शोधून काढताना महाराष्ट्रातील लोक आता हैदराबाद मार्गे बेळगावात दाखल होत आहेत. बेळगाव मध्ये खरे तर या लोकांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन व्हावयास हवे, परंतु तसे न होता हैदराबाद येथून येत असल्यामुळे या लोकांचे थेट होम काॅरन्टाईन केले जात आहे. हा प्रकार गंभीर असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी सूचना आमदार बेनके यांनी यावेळी केली.

Ad benke
Ad benke in zp covid review flood review meeting

पूर परिस्थितीबाबत बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्यास प्रामुख्याने येथील नाले कारणीभूत असल्याचे सांगितले. यासाठी बेळ्ळारी नाल्यासह शहर परिसरातील सर्व न्यायालयांची ची साफसफाई होणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे हे नाले फुटतात आणि पूर परिस्थिती निर्माण होते असे सांगून त्यांनी लेंडी नाल्याचे उदाहरण दिले. शहरातून वाहणारा लेंडी महिन्याभरापूर्वी स्वच्छ करण्यात आला होता. परंतु नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात हा नाला फुटला. यासाठी या नाल्याचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे, असे आमदार बेनके यांनी स्पष्ट केले.

आमदार अनिल बेनके यांनी केलेल्या सूचनांची तात्काळ दखल घेऊन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पावसाळ्यापूर्वी बल्लारी नाल्यासह शहर परिसरातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्याचे आदेश दिले सदर बैठकीत कोरोना प्रादुर्भाव आणि संभाव्य पूर परिस्थिती यासंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींनी देखील सूचना मांडल्या. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटना व संघसंस्थांचे पदाधिकारी तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.