आता यापुढे आरोग्य खात्याकडून परराज्यातून विशेषता महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांचे सात दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन झाल्यानंतर स्वॅबचे नमुने घेतले जाणार नाहीत.
यापूर्वी परराज्यातून विशेषता महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची त्यांचा इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन कालावधी समाप्त झाल्यानंतर स्वॅबची चाचणी घेतली जात होती.
परंतु आता नव्या एसओपीनुसार परराज्यातून येणाऱ्यांना सात दिवसांच्या इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन आणि त्यानंतर सात दिवसांचा होम काॅरन्टाईनसाठी पाठवीले जाईल. या दरम्यान त्यांच्यात संसर्गाची लक्षणे आढळली तरच त्यांची स्वॅब तपासणी केली जाणार आहे.