Friday, November 15, 2024

/

लॉक डाऊन शिथिलतेला एसएमएसचा फार्मूला

 belgaum

कोरोना महामारी मुळे धास्ती वाढत असताना आता काही ठिकाणी मुभा देण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन पूर्ण होत आहे तर काही शहरांना यामधून शिथिलता व मुक्तता करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. यासाठी एस एम एस चा फार्मूला वापरण्याचा आदेश सरकार देत आहे. दरम्यान बेळगाव पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात सूट मिळत आहे.

अनेक जण कोरोनाशी झुंजत असताना आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. बेळगाव शहरातील अनेक उद्योग व्यवसायांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता एस एम एस चा फार्मूलाने सर्व विकास कामांना गती देण्यात येणार आहे. याबाबतचे ट्विट पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी केले आहे.

Sms
Sms

एस म्हणजे सॅनीटायझर, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सोशल डिस्टंसिंग असा त्याचा अर्थ आहे. या अनुषंगाने यापुढे अनेक कामे करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. या एसएमएसचा फार्मूला याला नागरिक किती प्रतिसाद देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आणल्यानंतर आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून हे सारे प्रयत्न सुरू आहेत,असे सांगण्यात आले.

असे आहे बेळगाव पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांचे ट्विट sms ज्याचा बोध सर्वांनी घेणं गरजेचं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.