बेळगाव शहर परिसरात बेकायदेशीर दारू विकणार्यांची संख्या वाढतच आहे. विशेष करून ग्रामीण भागात दारू विकणारे अधिक आहेत. नंदिहळळी तालुका बेळगाव येथे बेकायदेशीर दारू विकणार्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मागील काही दिवसापासून तो दारू विकत असल्याची माहिती पोलिसांनी मिळतात अचानक धाड टाकून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. देवाप्पा बाळापा लोकूर वय 44 राहणार जाधव गल्ली नंदीहळळी या युवकाला अटक करण्यात आली आहे .
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सूनिलकुमार नंदेश्वर यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी एम मोहिते व सहकार्याने शुक्रवारी दुपारी धाड टाकून ही कारवाई केली आहे. त्याच्याजवळून बी पी रम, ओटी अशा एकूण 80 दारूची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
कर्नाटक पोलिस कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून या पुढे बेकायदेशीर दारू विकणार्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. त्याच्याकडून 80 पाकीटे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यावर पोलिस कायदा 32 व 34 अन्वये या फायर दाखल करण्यात आला आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यापुढे बेकायदेशीर दारू विकणार्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.