मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलीआणि पेरणी साठी पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आता पेरणीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांची शेतामध्ये धांदल सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत 40 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे तर उर्वरित पेरणीचे काम पूर्ण करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत.
अडीच लाख हेक्टर हून अधिक जमिनीत पेरणी चे काम पूर्ण करण्यात आले आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली आणि आठ दिवसांपूर्वीच झालेल्या दमदार पावसाने नंतर शेतकऱ्यांना पोषक वातावरण मिळाले. जिल्हा कृषी विभागाने या वर्षी सहा लाख 88 हजार 120 हेक्टर मध्ये पीक घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामधील 40 टक्के पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. तर 60 टक्के पेरणीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
मे अखेर पासूनच अवकाळी पावसाने तसेच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान करण्यात येत होते. मात्र मध्यंतरी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ वारा व पाऊस आला होता. त्यामुळे आणखी काही दिवस शेतकऱ्यांना पेरणीसाठी उघडीप हवी होती. ती आता मानसून अजून आगमन झाला नाही. मात्र आणखी एक आठ दिवस मान्सून पडू नये अशीच आशा शेतकऱ्यांनी व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी आठ दिवसात संपूर्ण पेरणी पूर्ण होईल असे असे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत 27 हजार 25 सेक्टर मध्ये भात पेरणी केली आहे तर सात हजार 439 सेक्टरमध्ये जोंधळा सहा हजार 465 हेक्टर मध्ये मूग आणि 2741 हेक्टरमध्ये सोयाबीन पेरणीचे काम पूर्ण झाले आहे तर अजूनही भात लागवड व इतर पिकाकडे शेतकरी वळले आहेत. त्यामुळे लवकरच पेरणीचे काम पूर्ण होणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.