आर्थिक संकटात सापडलेल्या पॉवरलूम मालकाकडून थेट साड्या खरेदी करणे तसेच शून्य व्याज दरात कर्ज वितरित करण्याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या बरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन हातमाग आणि वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री श्रीमंत पाटील यानी मंगळवारी सर्किट हाऊस येथे बोलताना दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री श्रीमंत पाटील पुढे म्हणाले की, याशिवाय पॉवरलूम चालविणाऱ्या कामगारांची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेण्याचे काम हाती घेऊन शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येईल.
यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली असून हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री श्रीमंत पाटील यांनी सांगितले.
पॉवरलूम खरेदी करून विद्युत माग बसविण्यासह विणकरांना द्यावयाच्या सोयी-सुविधाचे वाटप करण्याची मार्गसूची अतिशय सोपी आणि सरळ करण्यात येणार असल्याचे हातमाग आणि वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री श्रीमंत पाटील यानी स्पष्ट केले.
कालच बेळगावच्या विणकरानी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत आत्महत्या केलेल्या विणकर आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.