मरणहोळ प्रकरणी एकाला अटक तर आठ जणांवर गुन्हा

0
371
Maranhol pdo talathi beaten
Maranhol pdo talathi beaten
 belgaum

शुक्रवारी संशयितांचे घशातील नमुने घेण्यासाठी गेलेल्या पीडीओ आणि तलाठ्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी काकती पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्‍मण भरमा पाटील वय 59 राहणार मरणहोळ असे अटक करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. हे न्यू वंटमुरी कार्यक्षेत्र ग्रामपंचायतीमध्ये पीडीओ व तलाठी घशातील नमुने घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोरोना योध्याना मारहाण झाल्याप्रकरणी काकती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राम विकास अधिकारी प्रशांत यलाप्पा मूनवल्ली वय 37 व तलाठी प्रशांत दांनाप्पा नेसर्गी वय 32 या दोघांना मारहाण करण्यात आली. याचबरोबर आरोग्य विभागाच्या अंगणवाडी कर्मचारी व इतरांवर दगडफेक करण्याचा प्रकार घडला आहे.

 belgaum

लक्ष्मण पाटील लक्ष्मण गावडे अक्कंमा पाटील गंगुबाई पाटील संतुराम पाटील रेणुका पाटील रत्‍नाबाई पाटील राणी गावडे या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भादवी 143 323 332 341 353 504 506 कलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखीन फरारी असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी काकती पोलीस प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.