Friday, December 20, 2024

/

लिव्हर सिरोसिस (यकृत निबर होणे)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

यकृतातील विशिष्ट प्रकारच्या पेशी नष्ट झाल्या की यकृताचा आकार लहान होत जातो आणि ते निबर वा चामड्यासारखे चिवट बनते. यालाच यकृत निबर होणे म्हणे लिव्हर सिरोसिस म्हणतात.
कारणे आणि लक्षणे-
मध्यमवयीन व्यक्तींमध्ये बरीच वर्षे असलेल्या दारूच्या व्यसनाने हा आजार उद्भवतो. लक्षात आल्यावर दारूचे व्यसन वेळीच सोडले नाही तर हा आजार शेवटच्या टप्प्यात जाऊन मृत्यू ओढवतो. निकृष्ट दर्जाचे अन्न खाल्यामुळे अर्थात कुपोषणामुळे हा आजार होऊ शकतो. बहुदा खूप दारू पिणार्‍या व्यक्ती कुपोषणाच्याच बळी ठरतात. पचनसंस्थेत विषारी द्रव्ये साठून राहिल्यास त्यांचे रूपांतर यकृत निबर होण्यात होते.
हा आजार प्राथमिक अवस्थेत असताना वारंवार अपचन होते. अन्नावरची वासना उडते. उलट्या होऊ लागतात. काहीवेळा पोटात दुखते. पोट फुगल्यासारखे वाटते. वजन कमी होऊ लागते. हातापायाच्या काड्या होतात आणि पोटच तेवढे फुगल्यासारखे दिसते. त्वचा पिवळसर दिसते. डोळे आत गेल्यासारखे व पिवळट दिसतात. सर्वांगाला एक खराब वास येऊ लागतो. पोटावरच्या शिरा तट्ट फुगून येतात. चेहरा, मान, दंड व छातीचा वरचा भाग यावर लहान कोळ्यासारखे व्रण दिसून लागतात. तळहात गरम व लालसर दिसतात. नखे व जीभ नीळसर दिसते. चेहरा खंगल्यासारखा होतो, केस अतिशय गळतात. सतत अंगात बारीक ताप असल्यासाराखे वाटते. प्रजनन क्षमता कमी होते. नपुसंकत्व येऊ शकते. प्लीहा व मेंदू यांनाही धोका पोहोचू शकतो. वेळीच उपचार न केल्यास व मद्यसेवन न थांबवल्यास मृत्युअटळ असतो.

Lever cirrhossis
Lever cirrhossis

उपचार
होमिओपॅथी- मद्यपान आणि त्याचे दुष्परिणाम सर्वश्रुत असूनही आजही कित्येक तरूण मद्यपानाकडे एक सामाजिक संकेत म्हणून वळताना दिसतात. आजकाल तर सोशल ड्रिकिंग हा एक ट्रेंड बनू पहात आहे. आधी तरूण दारू पितात मग दारूच त्यांना कधी प्यायला लागते हे त्यांना समजतही नाही. आज दर दहा रूग्णांमध्ये एकतरी रूग्ण दारूच्या आहारी गेलेला आढळतो. दारूची सवय सोडवण्यासाठी व दारूचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी अनेक होमिओपॅथीक औषधे सुलभरित्या वापरता येतात. अल्कोहोलिक लिव्हर- सिरोसीसवरसुध्दा नक्स वोमिका, अकोनाईट, मर्कसॉल, पल्सेटिला, चिओनेंथस, सिपिया, ब्रोमियम अशी अनेकविध औषधे वापरता येतात. परंतु यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे इष्ट असते.
निसर्गोपचार- पपईच्या बिया- दारूच्या व्यसनाने व कुपोषणाने हा आजार झाला असेल तर पपईच्या काळ्या बियांचा रस काढावा. एक मोठा चमचा बियांचा रस व दहा थेंब ताज्या लिंबाचा रस एकत्र करून तो रोज एकदा किंवा दोनदा आजार्‍याला पाजावा.

ट्रेलिंग इक्लप्टा- वनस्पती शास्त्रात एलश्रळिींररश्रलर या नावाने ओळखली जाणारी वनस्पती, हिचा रस एक चमचा व एक चमचा मध दररोज तीन वेळा घ्यावा.
पिक्रोव्मिाझा- या वनस्पतीचे शास्त्रीय नाव झळलीेीहळूर- र्ज्ञीीीेर असे असून या वनस्पतीच्या मुळाची भुकटी एक चमचा व मध एक चमचा घेऊन दिवसातून दोनवेळा रूग्णाला द्यावी.
आहार- रूग्णाने शरीर विषद्रव्ये विरहीत (ऊशीेुंळषू) करण्यासाठी आत दिवस फळांचा रसाहार घ्यावा. बीट, लिंबू, पपई, द्राज्ञक्षे असे रस प्यायला द्यावेत. चोथा काढून टाकू नये. त्यानंतर दोन व तीन आठवडे दूध व फळे असा आहार द्यावा. सफरचंद, पिअर, द्राक्षे, संत्री, अननस अशी फळे खावीत. दिवसातून एक ते दीड लीटर दूध थोड्या थोड्या वेळाने प्यावे. दूध ताजे व गरम असावे.

त्यानंतर दोन दिवसांनी कडधान्ये, तृणधान्ये, भाज्या व इतर रसयुक्त पूर्ण आहार द्यावा. समिष आहार पूर्ण वर्ज्य असावा. नियमित सूर्य नमस्कार व श्वासनियमन आणि प्राणायाम यांना सुरूवात करावी. तळलेले, चरबीयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले डबाबंद पदार्थ, कडक चहा, कॉफी, मांसाहार वर्ज्यच असावा. जेवणात मीठ व साखर अत्यल्प असावी. या आजारातून रूग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. मद्यपानासंबंधी समुपदेशन व आहाराचा काटेकोरपणा यांना उपचाराचाच एक भाग बनवावे लागते. यासाठी वैद्यकीय उपचारांसोबत मुक्तांगण सारख्या सेवाभावी संस्थांचीही मदत आवश्यक असते.

Dr Sonali Sarnobat.
9916106896
9964946918

यकृत निबर होणे- (लिव्हर सिरोसिस) म्हणजे काय? यावर उपचार कोणते आहेत?काय सांगतात बेळगावच्या प्रसिद्ध डॉ सोनाली सरनोबत पहा खालील व्हीडिओत फक्त बेळगाव Live

#डाॅसोनालीसरनोबत
#लिव्हरसिरोसिस
#drsonalisarnobat
#homeopathicmedicine

यकृत निबर होणे- (लिव्हर सिरोसिस) म्हणजे काय? यावर उपचार कोणते आहेत? दारू प्याल्याने काय होतं, काय सांगतात बेळगावच्या…

Posted by Belgaum Live on Saturday, June 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.