जून महिन्याचा आजचा पहिला दिवस बेळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला आहे, कारण आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. राज्यात मात्र आज सोमवारी 1 जून रोजी नव्याने 187 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3,408 इतकी वाढली आहे
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 31 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 1 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 187 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 3 आंतरराष्ट्रीय, तर 117 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. नवीन रुग्ण नसल्यामुळे सोमवारी बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या मात्र 153 इतकी स्थिर होती.
राज्यातील 3,408 कोरोनाग्रस्तांपैकी 1,328 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 2,026 असून यापैकी 12 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 52 झाली असून यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी उडपी (73) जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकातील एकूण 29 जिल्हे कोरोनाग्रस्त असून या जिल्ह्यात आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 28 – एकूण रुग्ण 385), कलबुर्गी (24 -305), यादगिरी (00 -285), मंड्या (15 -285), उडपी (73 -260), रायचूर (00 -217), हासन (16 -173), बिदर (02 -165), बेळगाव (00 -160), दावणगिरी (00 -156), चिकबळ्ळापूर (05 -141), मंगळूर (04 -129), विजयपुरा (01 -123), म्हैसूर (00 -94), कारवार 00 -82), बागलकोट (02 -79), बेल्लारी (03 -51), शिमोगा (09 -51), धारवाड (02 -47), चित्रदुर्ग (00 -39), गदग (00 -35), तुमकुर (00 -31), कोलार (01 -24), चिक्कमंगळूर (00 -18), हावेरी (01 -15), बेंगलोर ग्रामीण (00 -15), कोप्पळ (00 -04), कोडगु (00 -03) आणि रामनगर (आज 00 – एकूण रुग्ण 01). याखेरीज 34 जण राज्याच्या अन्य भागातील आहेत
*जिल्ह्यात 2,374 अहवाल प्रलंबित*
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार सोमवार दि. 1 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 14,381 निरीक्षण पूर्ण झाले असून 10,378 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 153 इतकी स्थिर असून अद्याप 2,374 नमुन्यांचे अहवाल हाती येणे बाकी आहेत. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 5,945 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 41 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 1,779 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 6,616 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 13,085 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 153 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 10,378 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 41 आहेत. त्याचप्रमाणे 2,374 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकाच रुग्णाचा मृत्यू झाला असून 119 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.