कर्ले(ता.बेळगाव) येथे वाहन जाळल्या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.बेळगावहुन गोव्याला बेकायदेशीर रित्या गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून वाहन जाळण्यात आले होते.
5 जून रोजी रात्री कर्ले बेळवट्टी रोडवर गोवा पासिंग टमटम वाहनाला अज्ञातांनी आग लावली होती त्या नंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद केली होती. सदर वाहन कुणी जाळले याबाबत तपास सुरू केला होता.
पोलिसांनी वडगांव येथील आकाश मनोहर वाईंगडे,वाघवडे येथील रवी मुसळे,रामलिंग रवळू नायक,रघु अर्जुन कुडचीकर, भरमानी चिन्नप्पा पाटील अशी त्यांची नावे आहेत.
पहा 5 जून रोजी बेळगाव live ने अशी दिली होती बातमी