कर्नाटकने चार लाख कोरोना रुग्णांच्या तपासणीचा आकडा पार केला आहे.कर्नाटकातील रुग्ण बरे होण्याचा दरही आरोग्यदायी आहे.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 44 टक्के इतकी आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ के सुधाकर यांनी ट्विट करून दिली आहे.
कर्नाटकने चार लाख रुग्णांच्या तपासणीचा टप्पा मंगळवारी पूर्ण केला आहे.आजवर 400257 रुग्णांची तपासणी 71 प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.पॉजीटिव्ह रुग्णांचा दर 1.4 टक्के इतका आहे.
आरोग्य खात्यानुसार 387027 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.3248 ऍक्टिव्ह केस आहेत.आजवर 66 जणांचा मृत्यू झाला आहे.