कोणताही अपघात झाला तर मदत करण्याऐवजी अनेक जण व्हिडिओ फोटो काढण्याच्या नादात असतात. मात्र सूतगट्टी शिवापूर रोडवर ट्रकला अपघात झाल्याने चालक गंभीर झाला होता. त्याला सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल करेपर्यंत तब्बल एकशे नव्वद पोती साखर चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे शिवापूर परिसरात दवंडी पिटवून साखर वापस करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
केवळ दीड तासाच्या अवधीत सुमारे ३ लाख 16 हजार 706 रुपये किंमतीची 190 पोती साखर चोरण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत गांभीर्याने घेतले असून ककतीचे पोलीस निरीक्षक व त्यांचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
ज्याने कोणी ही साखर चोरली असेल त्यांनी तातडीने जमा करावी अशा सूचना पोलिसांनी केले आहेत. अन्यथा घरात शिरून प्रत्येकाच्या घरांची तपासणी करु असा इशाराही देण्यात आला आहे. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक सलमान मोहम्मदशफी चचडी वय 26 राहणार सांबरा याला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शिवापूर रोडवर राजगोळी येथील साखर कारखान्याहुन साखर घेऊन जात होता.
मात्र अपघात झाल्याने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत 190 होती साखर लंपास करण्यात आली होती. या ट्रकमध्ये 300 पोती साखर होती. त्यामधील 190 पोती पळविण्यात आली आहेत तर 110 पोती शिल्लक राहिले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन गावागावात दवंडी पिटवून साखर वापस करण्याची मागणी सुरू केली आहे. मात्र याला किती प्रतिसाद मिळतो हे देखील पाहण्यात गरजेचे आहे. काकती पोलिस स्थानकात याबाबतची नोंद झाली आहे.