राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप हाय कमांडने सगळ्यांना धक्का दिला असून डॉ प्रभाकर कोरे आणि रमेश कत्ती यांना डावलून बेळगाव माजी जि प अध्यक्ष इरण्णा कडाडी आणि बल्लारीचे भाजप प्रभारी अशोक गस्ती या दोघांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांना देखील जोरका झटका बसला आहे.
डॉ प्रभाकर कोरे आणि रमेश कत्ती यांच्या बरोबर विजय संकेश्वर ,प्रकाश शेट्टी यांची नावे चर्चेत होती .काल रात्रीपर्यंत प्रभाकर कोरे यांचे नाव निश्चित मानले जात होते.
पण सोमवारी सकाळी भाजप हाय कमांडने धक्का तंत्राचा वापर करून इरण्णा कडाडी आणि अशोक गस्ती यांची नावे जाहीर केली आहेत.त्यामुळे कोरे आणि कत्ती यांना धक्का बसला आहे.
कर्नाटकातील राज्य सभा निवडणुकीसाठी भाजप कुणाला उमेदवारी देणार याबद्दल राजकीय क्षेत्रात कुतूहल होतेच याशिवाय सर्व सामान्य जनतेचेही उमेदवारी कुणाला मिळते याकडे लक्ष लागले होते.रमेश कत्ती आणि प्रभाकर कोरे या दोघांनीही तिकीट मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग केले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही भाजप हाय कमांडने कोरे आणि कत्ती यांना डावलून इराणा कडाडी यांच्या पदरात आपले माप टाकले आहे.