21 जून 2020 ह्या सहाव्या आंतरराष्ट्रीय
योग दिवसाचे लष्कराच्या ऐतिहासिक आणि सुविख्यात दि मराठा लाइट इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते.
कोरोना वायरस (COVID-19) ह्या महामारीच्या वेळी कोरोना पासून बचाव करण्यासाठी ह्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाची थीम – स्वास्थ्यासाठी योग-घरातून योग ह्या आधारे सामाजिक अंतर आणि आरोग्यासंबंधी नियमपालन करुन योग अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते .योग अभ्यासांचे प्रोटोकॉल पालन करत प्रशिक्षित योग शिक्षकांच्या निर्देशानुसार योग आसन आणि प्राणायामांचे महत्व समजावत आसन आणि प्राणायाम करण्यात आले .
भारतीय लष्कराच्या अत्यंत सुविख्यात दि मराठा लाइट इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये प्रत्येक वेळी प्रशिक्षणार्थि सैनिकाना शारीरिक आणि मानसिक दृष्टिने स्वस्थ बनविण्यासाठी शारिरीक प्रशिक्षणाच्या व्यतिरिक्त योग आणि प्राणायामाचे प्रशिक्षण दिले जाते, ह्या कारणाने येथे प्रशिक्षण प्राप्त सैनिक आपल्या सैनिक जीवनातले महत्वपूर्ण कार्य करण्या बरोबर खेळामध्ये आणि साहसी अभियानात सुद्धा विशेष प्रावीण्यता प्राप्त करू शकले आहेेेत.
आज योग दिवसाच्या प्रसंगी रेजिमेंटल सेंटर मध्ये आयोजित योग शिविरामध्ये सर्व अधिकारी, जेसीओ, रिक्रूट आणि त्यांच्या परिवारानी सहभाागी होउन कार्यक्रम यशस्वी केला.