इंडियन एअर फोर्सला दैदिप्यमान परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे वाईट असोत किंवा चांगली कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी एअरमननी सदैव सज्ज रहावे असे आवाहन बेळगाव सांबरा एअरमन ट्रेनिंग सेंटरचे एअर कमोडोअर रवी शंकर यांनी केले आहे.
सांबरा येथील एअर फोर्स स्टेशन मधील ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एअरमनचा शानदार दीक्षांत समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी परेड निरीक्षण केल्यावर ते बोलत होते.
ते म्हणाले की नवीन तंत्रज्ञानाचा वेळोवेळी अवलंब करायला पाहिजे प्रशिक्षण काळात मिळालेल्या प्रशिक्षणाचा सेवा बजावताना उपयोग होणार आहे. प्रशिक्षित एअरमननी सेवा बजावताना देखील कोरोना संबंधी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे.मास्क वापरणे,सोशल डिस्टनसिंग पाळणे आवश्यक आहे स्वच्छते बाबत देखील प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे अश्या देखील सूचना रविशंकर यांनी केल्या.
3325 एअरमननी बेळगावातील सांबरा येथील एअरट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एअरमन देशाच्या विविध भागात सेवा बजावणार आहेत दीक्षांत कार्यक्रमास उपस्थित प्रमुख एअर कामोडअर आर रविशंकर एअरमनच्या संचलनाचे निरीक्षण करून मान वंदना स्वीकारली.
एअरमन विकास कुमार यांना प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट सामान्य सेवा, एअरमन हिमांशू चौधरी यांना शैक्षणिक क्षेत्रातसर्वोत्कृष्ट,एअरमन शिवम सिंघल यांना बेस्ट मार्क्समॅन तर अंकित कुमार यांना एकंदरीत गुणवत्ता यादीत अव्वल राहिल्याने बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यावेळी एअरमननी शानदार संचलन केले नंतर विविध प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणें फेडले.दीक्षांत कार्यक्रमाला हवाई दल अधिकारी कर्मचारी निमंत्रित आणि प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.