मरणहोळ येथे कोविड संशयितांचे घश्याच्या द्रवाचे नमुने आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य सहाय्यीकाना स्वॅब तर घेऊ दिलेच नाही शिवाय ग्रामस्थांनी पीडिओ आणि तलाठी यांना मारहाण करून कपडे फाडले.
सकाळी तहसीलदार,आरोग्य खात्याचे कर्मचारी मरणहोळ गावात गेले होते.त्यावेळी ग्रामस्थांनी स्वॅब देण्याचे कबुल केले होते पण ते निघून गेल्यावर त्यांनी स्वब देण्यास नकार दिला.आरोग्य खात्याच्या कर्मचारी देखील कितीतरी तास बसल्या पण स्वॅब देण्यास नकार दिला.
तलाठी आणि पीडिओ ग्रामस्थांना समजावून सांगून स्वॅब द्या असे सांगत असताना ग्रामस्थांनी तलाठी आणि पीडिओ यांना मारहाण करून कपडे फाडले.त्यामुळे आरोग्य सहाय्यीका महिला घाबरून पळाल्या. गावातील काही महिलांनी देखील आरोग्य सहाय्यीकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून देखील ते बराच वेळ पोचलेच नव्हते. अश्या स्थितीत ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि पी डी ओ तलाठी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी स्वॅब देण्यास का नकार दिला ही बाब मात्र समजु शकली नाही