देश कोरोना सारख्या महाभयंकर रोगात गुरफटत जात आहे. मात्र यामध्ये पॉझिटिव्ह संख्या वाढत असली तरी त्याच दृष्टिकोनातून निगेटिव होणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पण या साऱ्या प्रकारात नुकतीच बेळगाव तालुक्यातील एका तरुणाने निगेटिव आल्यानंतर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.
बेळगाव तालुक्यातील उत्तर भागात हा प्रकार घडला असून यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्यांची चूक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात संबंधित तरुण हा परराज्यातून परतला होता. तो संपूर्ण आरोग्य तपासणी करून घरी होता. मात्र काहींनी तो पॉझिटिव्ह असल्याचे सांगून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तो घरी परतला तेव्हा त्याने चक्क फटाके लावून आपला आनंदोत्सव साजरा केला आहे.
याबाबत एका वरिष्ठ आमदारांनी त्याला असे न करण्याचे सांगितले आहे आणि तंबीही दिली आहे. त्यामुळे फटाके लावून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या तरुण विषयी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
बेळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये असे प्रकार घडत आहेत तर संबंधित तरुणाला सूचनाही करण्यात आले आहेत. आनंदोत्सव काही सदस्यांच्या नाकावर टिचून केल्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. त्यामुळे राजकारणाचा गंध आता कोरोनाला लागल्याचे समजते.