गोगटे सर्कल उड्डाण पुलावर वाकलेल्या अवस्थेतील तो धोकादायक विद्युत पथदीप सोशल मीडियावर आवाज उठवताच काढण्यात आला आहे. ब्रिज ठेकेदाराच्या गलथान कामाचा फटका अद्याप बसत असून पहिल्या पावसाच्या वाऱ्यालाच विद्युत पथदीप वाकला होता व धोकादायक बनला होता.
रविवारी सकाळी बेळगाव Live सह अनेक सोशल मीडियावरील वृत्त वाहिन्यांनी या झुकलेल्या धोकादायक खांब्याचे वृत्त प्रसारित केले होते याची दखल रेल्वे खात्याने घेत रविवारी सायंकाळी हा धोकादायक पथदीप पूर्ण पणे वाकवून डिव्हाइडर वर काढून ठेवलं आहे.
मोठा गाजावाजा करून रेल्वे मंत्र्यांनी गोगटे सर्कल जवळील रेल्वे ओव्हर ब्रिजचे उदघाटन करण्यात आल होते मात्र गेल्या दोन वर्षात सदर ब्रिज अनेकदा दुरुस्त करण्यात आला आहे या ब्रिजची दुरुस्ती केवळ चार महिन्यापूर्वी झाली असताना पुन्हा एकदा ब्रिजच्या सुमार कामाचा दर्जा समोर आला आहे.
ब्रिज वर सुरुवातीच्या काळात गार्डन बरोबरच आकर्षित पथदीप बसवण्यात आले. मात्र वर्ष दीड वर्षातच या पद्धतीत त्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.केवळ पथदीपचं नव्हे तर उड्डाणपुला बाबत देखील बेळगावच्या जनतेने अनेकदा आवाज उचलला आहे त्यामुळे ब्रिज उदघाटनाची घाई करणारे अनेकदा टीकेचे धनी बनले होते. ब्रिजचे दुरुस्ती काम देखील योग्य रित्या न झाल्याने पथदीप देखील धोकादायक बनत आहेत.