उत्तर भागातील जीवनदायिनी म्हणून मार्कंडेय नदिकडे पाहिले जाते. मात्र या नदीत ड्रेनेज पाणी तसेच हॉस्पिटलमधधील शस्त्रक्रिया झालेले रासायनिक पाणी यासह इतर कचऱ्यामुळे मार्कंडेय नदी प्रदूषित झाली आहे. या नदीची स्वच्छता करण्यासाठी वारंवार निवेदने व आंदोलने करण्यात आली.
इस्पितळा परिसरातुन नाल्याद्वारे मेडिकल कचरा व रसायन मिश्रित पाणी मार्कंडेय नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित होत आहे कंग्राळी भागातील विहिरींचे देखील पाणी प्रदूषित होत आहे मेडिकल कचरा शेतीत वाहून जात आहे मार्कंडेय नदी प्रदूषित होण्यापासून रोखा अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली.
बेळगाव तालुका आणि शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सोमवारी जिल्हा पंचायत सभागृहात तालूका पंचायत जिल्हा पंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या सभेचे आयोजन केले होते त्या बैठकीत त्यांनी हा पाणी प्रदूषणाचा मुद्दा उचलला.इस्पितळाचे मेडिकल वेस्ट नाल्याद्वारे नदीत मिसळत आहे नाल्यांचे देखील अतिक्रमण झाले आहे अश्यात मार्कंडेय वाचवा अशी मागणी पाटील यांनी केली.
बैठकीत उपस्थित विधान परिषद महंतेश कवटगीमठ यांच्याशी चर्चा करत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मनपा अधिकाऱ्यांना तातडीने नेहरू नगर नाल्याचा सर्व्हे करा जिल्हा पंचायत सदस्यांना सोबत घेऊन सर्व्हे करा अश्या सूचना दिल्या.गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित एपीएमसी कंग्राळी खुर्द रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे त्याची गती वाढवा अशी देखील मागणी त्यांनी केली.
स्मशानभूमीला हवी जागा-
कंग्राळी खुर्द गावांन एपीएमसी निर्माण करण्यासाठी चारशे एकर जमीन दिली आहे मात्र अनेकदा मागणी करून देखील स्मशानभूमीसाठी जागा का देत नाही असा प्रश्न उपस्थित करताच जिल्हाधिकारी डॉ बोमनहळळी यांनी ग्राम पंचायतीतुन नवीन ठराव एपीएमसी कडे द्यावा त्यावर एपीएमसी मधून जागा देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.