मास्कमुळे विवाह समारंभात मुलीकडचे कोण आणि मुलाकडचे कोण हे ओळखायला कठीण जात आहे.त्यावर एकाने आगळ्यावेगळ्या मास्कचा उपाय सुचवला आहे.
कोरोनामुळे विवाह समारंभाला केवळ पन्नास व्यक्तींना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.शिवाय अनेक नियम,अटींचे पालन देखील वधूवरांना करावे लागत आहे.मास्कमुळे वधू कडील आणि वरा कडील मंडळी ओळखण्यात अडचण येते.यावर एकाने नामी उपाय शोधलाय.
वऱ्हाडी मंडळींना ओळखता यावे म्हणून वेगवेगळे दोन तऱ्हेचे मास्क तयार करण्यात आले आहेत.एका मास्कवर वधूचे चित्र असून त्यावर आम्ही मुलीकडचे म्हणून लिहिण्यात आलंय तर दुसऱ्या मास्कवर आम्ही मुलाकडचे असे वराचे चित्र काढून लिहिण्यात आले आहे.
या अफलातून मास्कचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या मास्कमुळे मुलीकडचे कोण आणि मुलाकडचे कोण हे समजणे शक्य झाले आहे.