फोर्टीन फायनान्सकडून 12.5 लाख रु. खर्चून शहरातील धर्मवीर संभाजी चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शनिवारी सकाळी भूमिपूजनाने शुभारंभ करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ कार्यकर्ते अर्जुन गौडाडकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
साडे बारा लाख रुपये खर्चून या चौकाचे सुशोभिकरण होणार आहे.यासाठी उत्कृष्ट आराखडा देखील तयार करण्यात आला आहे अनेक शिव भक्तांची मागणी अनुसार हा चौक सुशोभित होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड अनिल बेनके यांनीही हस्ते कुदळ मारून धर्मवीर संभाजी चौक सौंदर्यीकरण कामाचा भूमी पूजन करून शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी आमदार बेनके यांनी छ. संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर,माजी महापौर सरिता पाटील,माजी सुनील जाधव,रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.
बेळगाव शहराच्या या प्रसिद्ध असलेल्या धर्मवीर संभाजी चौका बद्दल हे तुम्हांला माहीत आहे का?