असाच पाऊस सुरू झाला तर पुन्हा महापुराचा फटका मागील वर्षीच्या महापुराचा फटका अजूनही नागरिकांना विसरता आला नाही. जर पाऊस असाच सुरू राहिला तर यावर्षीही अपेक्षे पेक्षा जास्ती महापुराचा फटका बसणार यात शंका नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बहुदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाणीसाठ्याचा निचरा झाला नसल्याने अजूनही धरणांमधील पाणीसाठा अर्ध्याच्या वर आहे.
त्यामुळे जर यावेळी संततधार पावसाची सुरू राहिली तर मागील वर्षीपेक्षा या वर्षी अधिक प्रमाणात महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे आता पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जर जोराचा पाऊस झाला आणि पुन्हा महापुराचा फटका नागरिकांना बसला तर मात्र सर्वजण मेटाकुटीला येणार याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील वर्षी झालेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर यावर्षी ही याची शक्यता नाकारता येत नाही पावसाची रिपरिप सुरूच राहिली तर यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेकांमध्ये धास्ती लागून राहिली आहे. धरणातील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला नव्हता. त्यामध्ये आता मान्सूनपूर्व पावसाने आणि आता सुरू असलेल्या पावसाने जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास सुरुवात केली आहे. तर धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे.
त्यामुळे जर धरणे भरली तर पाणी विसर्ग होणार आणि पाणी विसर्ग झाले तर महापुराचा फटका बसणार याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या वर्षीही महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासून प्रशासनाने कामाला लागणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पंधरा दिवसापूर्वी खरिप धुळवाफ पेरणी केलेली भात पीकं मागील पावसाने उगवली पण जमीनीतील तन न गेल्याने भाताबरोबर तोही मोठ्या प्रमाणात उगवल्याने अनेक शेतकऱ्यांनी परत कुळवण करुन भात पेरणी केली त्याची आत्ताच उगवण सुरु झाल्याने गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसाने ती कुजण्याची शक्यता असल्याने शेतकरी दुबार,तीबार पेरणी लागते का या चिंतेत आहेत. कारण कोवळ्या पीकांना जास्त पाणी झाले कि ती कुजण्याची दाट शक्यता असते.