कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने झुंजत असलेल्यांना झुरळाचे जेवण मिळत आहे होय हा धक्कादायक प्रकार बिम्स मध्ये उघडकीस आला आहे.
कोरोना विषाणू संपूर्ण जगाला जगवण्याचे आणि माणुसकी दाखवण्याचे शिकवले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना आरोग्य खाते अधिकच जपत आहे. मात्र सध्या बेळगाव जिल्ह्यात आणि विशेष करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांची कशा प्रकारे देखभाल सुरू आहे, असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना झुरळाचे जेवण देण्यात येत असल्याचा प्रकार सोशल मीडियावर एका व्हीडिओ द्वारे उघडकीस आला आहे. बेळगाव लाईव्हने या बाबतचा व्हिडिओ आणि थेट फोटो या बातमी द्वारे नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खाते किती निष्काळजीपणाने आपली सेवा बजावत आहेत हे समोर आले आहे. दरम्यान प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करण्याची गरज आहे ते सोडून आरोग्य खाते वाटेल तसे जेवण देऊन नागरिकांचे आणि कोरोना बाधितांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम करत आहे. रविवारी कोरोना बाधित रुग्णांना चक्क झुरळ मिश्रीत जेवण देण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.
यादरम्यान आरोग्य खात्याच्या निष्काळजीपणाचा आणि महानगरपालिकेने दाखवलेल्या रुग्णांच्या निष्काळजीचेच दर्शन दिसून आले. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णावर कशाप्रकारे उपचार सुरू असतील हे देखील अनेकांना समजले आहे. त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषक जेवण हवे आहे. त्यामध्ये झुरळ आणि आळी असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
त्यामुळे कोररोना बाधित यांची कोणत्या प्रकारे देखभाल करण्यात येत आहे हा अंतर्मुख करणारा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान या झुरळाच्या जेवणामुळे कोरोणा बाधित रुग्ण बरे होतील का किंवा त्यांच्या आरोग्य सुदृढ होईल का? हा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. त्यामुळे आरोग्य खाते महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या तिघांच्या दुर्लक्ष पणाचा फटका अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये असेच जाणकारांतून बोलण्यात येत आहे.
जेवणात झुरळ असल्याचे याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले आहेत. जिल्हा प्रशासनाचा आंधळा कारभार उघडा पडला आहे. त्यामुळे यापुढे तरी कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्याच्या किंवा त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करू नये अशीच मागणी होत आहे.
बिम्स इस्पितळातला धक्कादायक प्रकार-कोरोना रुग्णांच्या जेवणात चक्क झुरळ-रविवारी दुपारचा व्हीडिओ व्हायरल पहा खालील…
Posted by Belgaum Live on Sunday, June 7, 2020