बेळगाव रेल्वे स्थानक टिकीट चेकर स्टाफतर्फे स्थानकावरील परवानाधारक गरीब गरजू कूली -पोर्टरना जीवनावश्यक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले.
सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी रेल्वेसेवा अद्यापही पूर्ववत झालेले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गरीब कुली – पोर्टर लोकांची कठीण परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव रेल्वे स्थानकाशी संबंधित तिकीट चेकर स्टाफने स्वखर्चाने संबंधित कुली -पोर्टरना मदत करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आज शनिवारी बेळगाव रेल्वे स्थानक कार्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी तिकीट चेकर मंडळींच्या हस्ते 6 कुली -पोर्टर्सना एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे कीट वितरित करण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, साखर, चहा पावडर, डाळ, तेल, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
याप्रसंगी चीफ टिकीट इंस्पेक्टर सुनील आपटेकर यांच्यासह श्रीमती रुकसाना, प्रसन्ना राजू, जबीउल्ला, अमित पाटील, शंभूसिंग मीना व रमेश मीना हे तिकीट चेकर उपस्थित होते.
यापूर्वी लॉक डाऊनच्या काळात तीन वेळा बेळगावच्या रेल्वे टिकीट चेकर स्टाफतर्फे स्वखर्चाने गरीब कुली -पोर्टर लोकांना जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली होती. देशातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगावच्या तिकीट चेकर्सनी पंतप्रधान सहाय्यता निधीला देखील भरीव मदत केली आहे.
सध्या लॉक डाऊन शिथिल झाला असला तरी रेल्वेसेवा अद्यापही पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे कुली पोर्टर लोकांची अद्यापही परवड सुरू असल्याने निवडक सहा परवानाधारक कुली पोर्टर्सना आम्ही जीवनावश्यक साहित्याची मदत केली आहे, असे चीफ टिकीट इन्स्पेक्टर सुनील आपटेकर यानी “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना सांगितले.