लॉक डाऊनमुळे बंद करण्यात आलेली मंदिरे तब्बल ७३ दिवसांनी भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात सोमवार असल्यामुळे सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली होती.सनई,चौघडा वादनामुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती.मंदिराच्या प्रवेशद्वारात सुरक्षा रक्षक तैनात करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना हॅन्ड सॅनिटायझर देण्यात येत आहे.
थर्मल स्क्रिनिंग करून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.मंदिरात फुले, फळे,नारळ,कापूर, उदबत्ती नेण्यास भक्तांना मनाई करण्यात आली आहे.मंदिरात येणाऱ्या भक्तांनी सोशल डिस्टनसिंग आणि अन्य नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मंदिरे सोमवारपासून उघडली असली तरी सौंदत्ती यल्लमा आणि रायबाग तालुक्यातील मायक्का चिंचली देवस्थान ३० जून पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.