सरकारी अधिकार्यांचे धाबे दणाणले-एसीबीने कारवाई ही मोहीम सुरूच ठेवले आहे. गुरुवारी बेळगाव शहरात चार ठिकाणी सरकारी अधिकारी कार्यालयावर छापे टाकले आहेत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून यापुढेही ही कारवाई अशीच करणारा असे सांगण्यात येत आहे.
एसीबीच्या अधिकाऱयांनी गुरुवारी चार शासकीय कार्यालयांवर छापे टाकले आहेत. नेहरुनगर, महांतेशनगर, रामतीर्थनगर येथे केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे. रात्री उशीरापर्यंत चारही कार्यालयात कागदपत्रांची तपासणी सुरु होती. या कारवाईमुळे सर्व शासकीय अधिकारी यांच्यामध्ये खळबळ माजली असून अशा कारवाया वारंवार व्हाव्यात अशी मागणीही सर्वसामान्यांतून करण्यात येत आहे.
रामतीर्थनगर येथील कर्नाटक अल्पसंख्यांक विकास निगम, नेहरुनगर येथील देवराज अर्स मागासवर्गीय विकास निगम, महांतेशनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास निगम व वाल्मिकी विकास निगमच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.
चार कार्यालयावर छापे टाकण्यासाठी केवळ बेळगावच नव्हे तर गदग, बागलकोट व धारवाड येथील एसीबीच्या अधिकाऱयांनाही पाचारण करण्यात आले आहे. एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधिक्षक शरणाप्पा, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, सुनीलकुमार, धारवाडचे पोलीस निरीक्षक बी. ए. जाधव आदींसह 40 हून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले आहेत. या चारही कार्यालयातून अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करून देण्यात दिरंगाई केली होती त्यामुळे त्यांची तक्रार तिकडे करण्यात आली होती याचे दखल घेऊनच ही कारवाइ करण्यात आली आहे.
या तक्रारींच्या पार्श्वभूमिवर गुरुवारी एकाचवेळी एसीबीने धडक मोहीम राबविली असून रात्री उशीरापर्यंत या चारही कार्यालयात तपासणी सुरु होती.
एसीबीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यालयात आलेल्या अर्जांची संख्या व त्यापैकी अधिकारी व कर्मचाऱयांनी किती अर्ज हातावेगळै केले आहेत. कामे प्रलंबित का आहेत? कामांसाठी लाभार्थींकडून लाच स्वीकारण्याचे प्राकर आदी विषयीं चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.