सोशल मीडियावर पोस्ट टाकताना घ्यावी काळजी बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 204 वर पोहोचली आहे. त्यामुळे द्विशतकीय पार केलेल्या बेळगाव जिल्ह्यात आता धास्ती वाढली आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना बाधित यांची नावे पसरविण्याचा प्रकार थांबणे गरजेचे आहे. दरम्यान कायद्यानुसार हा गुन्हा आहे.
मात्र याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक जण कोरोना बाधितांची नावे सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यामुळे याचा परिणाम विपरीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडियावर पोस्ट टाकताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान जे कोणी असे पोस्ट टाकत असतील त्यांना वेळीच आवर घालने सोयीचे ठरणार असून याकडे पोलिस प्रशासनाने ही आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील महिन्याभरात कोरोना बाधितांची नावे सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. विशेष करून आरोग्य विभागाच्या हेल्थ बुलेटीनमध्ये ही नावे देण्यात येतात. मात्र जेव्हा ही पोस्ट अनेक ग्रुपच्या माध्यमातून व्हायरल केली जाते. तेव्हा अनेकांची नावे सामोरे येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. याकडे आता विभागाने तातडीने लक्ष देऊन ही पोस्ट व्हायरल करणार्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव बदनाम करण्याचा गुन्हाही दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कोणतीही पोस्ट टाकताना विचार करून ती अपलोड करावी असेच जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. कुणाचेही नाव बदनाम करणे हे चुकीचे आहे. विशेष करून कोरोना सारख्या महाभयंकर रोगामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची नावे प्रसिद्ध करू नये असे नियम आहेत. मात्र हे नियम डावलून अनेक जण सोशल मीडियावर नावे व्हायरल करतानाचे चित्र दिसून येत आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.