बेळगावसह कर्नाटकातील काही भागात आगामी 48 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.उडुपीसह किनारपट्टी भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे.मुसळधार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
12 आणि 13 जून रोजी बेळगाव,धारवाड,हावेरी येथे ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मागील आठवड्यात वादळ आल्याने बेळगावात जोरदार पाऊस पडला होता त्या नंतर पावसाचे प्रमाण कमी झाले होते आता पुन्हा अलर्ट आल्याने 12 व 13 रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.