बेळगावात सकाळी सकाळी एसीबी ने धाडसत्र सुरू केले आहे.एसीबीच्या चार पथकांनी एकाच वेळी धाड टाकून तपासाला प्रारंभ केला आहे.वजन माप खात्याच्या अधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.
वजन माप खात्याचे सहाय्यक नियंत्रक सुभाष उप्पार यांचे निवासस्थान,भाडोत्री घर ,कार्यालय,त्यांच्या पाहुण्याचे बसवणं कुडची येथील घर अशा चार ठिकाणी तीस एसीबी कर्मचाऱ्यांनी धाड टाकली आहे.
कार्यालय आणि घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात एसीबी अधिकारी गुंतले आहेत.एसीबी एस पी बी एस न्यामगौडर यांच्या नेतृत्वाखाली धाड घालण्यात आली आहे.एक डीएसपी ,सात इन्सपेक्टर आणि वीस कर्मचारी यांचा धाड घातलेल्या पथकात समावेश आहे.