कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि शासनाचा आदेशावरून यंदाची आषाढी एकादशीची पंढरपूर वारी रद्द झाली असली तरी “ठाईस बैसोनी कराये चित्त आवडी अनंत आळवावा…” असे संत श्री ज्ञानेश्वरांनी म्हंटल्याप्रमाणे वारकरी मंडळींनी आपापल्या घरात राहून पांडुरंगाला आळवावे, असे आवाहन हभप रत्नाकर उंडागळे महाराज व ज्येष्ठ ह.भ.प. शंकर बाबली महाराज यांनी केले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने बेळगावसह सीमा भागातून शेकडो दिंड्या आणि वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे सीमाभागातील वारकरी मंडळींना आपापल्या घरात बसून विठ्ठलाचे नामस्मरण करावे लागणार आहे. यासंदर्भात “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना व्यक्त केले.
“ठाईस बैसोनी कराये चित्त आवडी अनंत आळवावा…” कसे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हंटले आहे. पंढरपूरला जाणे जमत नसेल तर जिथे आहात तिथे बसून विठ्ठलाचे नामस्मरण करावे. असे म्हणतात की, “तो हा विठ्ठल बरवा..” हे म्हणत असताना यातला “तो हा” आपल्यामध्ये असलेला “विठ्ठल” आहे, हे लक्षात घेऊन मनापासून नामस्मरण करा. त्यानुसार सध्या कोरोना प्रादुर्भाव आजच्या काळात पंढरपूरला जाता येत नसते तरी आपण सर्वांनी आपापल्या घरात बसून विठुरायाचे नामस्मरण करूया, असे बाबली महाराज म्हणाले.
बेळगावसह सीमाभागातील वारकऱ्यांची संख्या आणि येथून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीबाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले की, बेळगांवसह सीमाभागात लाखो वारकरी आहेत. त्याचप्रमाणे येथून निघणाऱ्या दिंड्या देखील भरपूर असल्यातरी आळंदीहून येणाऱ्या फक्त तीन आहेत. यापैकी एम. के. हुबळी येथून निघणारी दिंडी ही एक दिंडी आहे. ही दिंडी हुबळीहून आळंदीपर्यंत आणि तेथून पंढरपूरला जाणारी एकमेव दिंडी आहे. त्याचप्रमाणे बेळगाव वारकरी महासंघाची दिंडी आळंदी पासून पंढरपूरपर्यंत येते. तसेच महादेव कावळे यांची दिंडी देखील आळंदीहून पंढरपूरला येते. या आळंदीहून निघणाऱ्या तीन प्रमुख दिंडी आहेत. याखेरीज वास्कर महाराजांच्या शिष्यांच्या दिंड्या बऱ्याचशा आहेत. सीमाभागातील सांबर, निलजी, हिंडलगा, कंग्राळी, बेळगाव, येळ्ळूर परिसर, खानापूर वगैरे ठिकाणाहून शेकडो दिंड्या पंढरपूरला जातात आणि 12 ते 14 लाखापर्यंत वारकरी दरवर्षी पंढरपुरात जमा होत असतात, असे शंकर बाबली महाराजांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्या बुधवार दि. 1 जुलै रोजी सर्व विठ्ठल मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत. तेंव्हा विठ्ठल भक्तांनी आणि वारकऱ्यांनी “ठाईस बैसोनी कराये चित्त आवडी अनंत आळवावा…” यानुसार घरी बसून पांडुरंगाला आळवावे. याच पद्धतीने दशमी व एकादशी दिवशी सोशल डिस्टंसिंग, मास्क आदी नियमांचे पालन करून नामस्मरण व भजन करावे आणि द्वादशीला पारणं फेडावं. असे आवाहन बेळगाव भाविक सेवा संघातर्फे हभप शंकर बाबली महाराजांनी शेवटी केले.
‘ठाईस बैसोनी कराये चित्त आवडी अनंत आळवावा’ ‘संत श्री ज्ञानेश्वर’ -आषाढी एकादशी निमित्त पहिल्यांदाच सीमाभागातील वारकरी घरातूनच घेणार विठूरायचं दर्शन-काय आहेत बेळगावातील वारकरी संघाच्या भावना-काय म्हणाले हभप रमाकांत उंडाळे महाराज व हभप शंकर बाबली महाराज पहा खालील व्हीडिओत
#बेळगावआषाढीएकादशी
#वारकरीसंघबेळगाव
#belgaumwarkarisangh
#belgaumlivenews
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1144073299283595&id=375504746140458