बेळगाव जिल्हा पंचायत आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी आज बुधवारी आपल्या कार्यक्षेत्रातील के. के. कोप्प गावाला भेट देऊन तेथे मनरेगा योजने अंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या कामाची पाहणी केली.
बेळगाव जि. पं. आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी आज बुधवारी के. के. कोप्प (ता. बेळगाव) गावाला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत त्या क्षेत्रातील तालुका पंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. के. के. कोप्प येथे मनरेगा योजनेअंतर्गत तलावाचे काम सुरू आहे या कामाची रमेश गोरल यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
त्याचप्रमाणे स्वतः हातात कुदळ घेऊन काही काळ श्रमदानही केले. या ठिकाणी के. के. कोप्पसह हलगीमर्डी आणि नागेरहाळ या गावातील सुमारे 500 कामगार तलावाचे काम करत आहेत. सध्या लॉक डाऊनच्या काळातील बिकट परिस्थितीत तलावाच्या कामाच्या स्वरूपात रोजगार मिळाल्याने संबंधित कामगारांनी गोरल यांच्याकडे समाधान व्यक्त केले.
तलावाच्या पाहणी दौरा प्रसंगी जि, पं. सदस्य रमेश गोरल यांना कांही कामगार मास्क न वापरता काम करत असल्याचे आढळून आले. त्याची तात्काळ दखल घेऊन गोरल यांनी संबंधीत कामगारांना एकत्र जमा करून त्यांना कोरोना प्रादुर्भाव आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिग, मास्कचा वापर आदी सरकारी सूचना व नियम काटेकोर पालन करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.