ई पास नसताना बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.
मार्गदर्शक तत्वानुसार सेवसिंधु पोर्टल वरून ई पास मिळवून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास अनुमती आहे.पण काही जण ई पास न घेता आडमार्गाने बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करत असल्याचे आढळून आले आहे.अशा व्यक्तीवर फौजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.
ई पास नसताना जिल्ह्यात प्रवेश करणे हा गुन्हा आहे.त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
ई पास न घेता आलेल्या व्यक्तींनी आपणहून आरोग्य खात्याशी संपर्क साधून आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.अशा व्यक्तींनी आपल्या भागातील पोलीस स्थानकाला देखील याची माहिती देणे आवश्यक आहे.
बेकायदेशीररीत्या प्रवेश केलेल्यानी माहिती लपवून ठेवली तरी त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे.बाहेरून बेकायदेशीर रित्या आलेल्या व्यक्तींची माहिती नागरिकांना कळल्यास त्यांनी (0831)2407290 या जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.