Tuesday, January 28, 2025

/

गेल्या 24 तासात राज्यात सापडले तब्बल 216 कोरोना बाधित!

 belgaum

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे आज शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 216 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 1959 इतकी झाली असून आतापर्यंत 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने शनिवारी जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 22 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार दि. 23 मे 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 216 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले असून त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,959 इतकी वाढली आहे. राज्यात सध्या ॲक्टिव्ह केसेस 1,307 इतकी असून यापैकी 13 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 608 जणांना पूर्णपणे बरे झाले असल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण यादगीर जिल्ह्यामध्ये (72) आढळून आले आहेत. नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले जिल्हे आणि त्या जिल्ह्यांमध्ये काल गुरुवार सायंकाळपासून आढळलेले रुग्ण व एकूण रुग्ण यांचा थोडक्यात तपशील अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर ( नवे 4 रुग्ण, एकूण 265 रुग्ण), मंड्या (28 एकूण 237), कलबुर्गी (1 एकूण 135), बेळगाव (1एकूण 127), दावणगिरी (3 एकूण 121), यादगिर (72 एकूण 87), हासन (4 एकूण 84), बिदर (3 एकूण 79), कारवार (21 एकूण 66), रायचूर (40 एकूण 66), मंगळूर (3 एकूण 57), उडपी (3 एकूण 53), धारवाड (5 एकूण 38), गदग (15 एकूण 35), बेळ्ळारी (3 एकूण 33) आणि कोलार (नवे 3 रुग्ण एकूण 14 रुग्ण).

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.