लॉक डाऊनच्या काळात गुन्हे कमी झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या.पण आता लॉक डाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यावर गेले 55 दिवस कोरोनाच्या भीतीने घरात बसलेले चोर आता पुन्हा सक्रिय झाले असून पुन्हा त्यांनी आपला उद्योग सुरू केला आहे हे हरिकाका कंपाऊंड मध्ये झालेल्या चोरीवरून सिद्ध होते.
हरिकाका कंपाऊंडमध्ये लक्ष्मी मोटार बॉडी बिल्डर आहे.तेथे दुरुस्तीसाठी आलेल्या एका ट्रकचे चोरट्यानी आठही टायर चोरण्याचा प्रताप केला आहे.त्यामुळे दीड ते दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे.
लॉक डाऊनमुळे हवालदिल झालेले चोरटे आता सक्रिय झाले असून पैसे कमविण्यासाठी ते आता काही पण चोरायला तयार झालेत असेच दिसून येते.या प्रकरणी माळमारुती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.माळ मारुती पोलिसांनी देखील या चोरीची पहाणी केली आहे.